फूसभाजी की पूसभाजी ?
फोडणीने श्रीमंत होणारी एक भाजी कोवळ्या फणसाची, म्हणजे
पाऱ्याची, म्हणजे कुयरीची भाजी ! तिलाच म्हणतात फूस किंवा
पूसभाजी.
अगदी लहानपणापास्नं ऐकतेय हा शब्द. आम्ही भुवात (भू, ता. राजापूर) राहायला असतानाची आठवण आहे.
माझी आई पेंडखळ्याच्या शाळेत शिक्षिका होती, मीही
चौथीपर्यंत त्याच शाळेत गेले. शनिवारी सकाळची शाळा असे. कोवळे फणस झाडावर दिसू लागल्यावर दुपारी घरी येताना
रस्त्यावरनं घराच्या मागच्या अंगणात शशिकाका ( श्री. शशिकांत गुरव, तेरवण) वावरताना
दिसले की कळायचं, आज पाऱ्याची भाजी मिळणार. त्यासोबत ढकूही
तयार असं हे महद्भाग्याचं लक्षण असे. शशिकाकांना ही भाजी करण्याचा मूड यायचा. मागच्या
अंगणात पाणचूल होती. ते त्या चुलीवरच स्वयंपाक करीत. त्यामुळे भाजीला खास धुरकट चव येई.
शहरात ही भाजी तितकीशी केली जात नाही. माझं भाग्य मात्र चांगलं आहे या बाबतीत.
लग्नानंतरही आई-बाबा दरवर्षी पाठवतात फणसाचा पारा नि ह्यांनाही आवडते भाजी. गेल्या वर्षी बाबांनी दोन विलायती फणस पाठवले होते. मी whats app वर भाजीचे फोटो पाठवले. त्यांचा फोन आला, म्हणाले, ‘तरी आपल्याकडच्या पाऱ्यांची चव नाय
त्यांना. मला बघायला वेळ नाय झाला, नाहीतर मिळाले असते. आता
पौष म्हणजे सीझन सुरू झाला ना!’
माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. अरे!!!
पौष! त्याचा ग्रामीण बोलीत झाला ‘पूस’. पौषातली भाजी म्हणजे पूसभाजी. फूसभाजी
नव्हे. पौषातल्या पौर्णिमेला बोलीत ‘पुशी पुनव’ म्हणतात. तसंच हे रूप झालं – पूस.
लहानपणापास्नं ज्या भाजीने जिभेला
चवीची ओळख करून घ्यायला शिकवली, तिच्या नावामागचा हा
अगदी सोप्पा संदर्भ हा असा इतक्या वर्षांनी कळला!
पौष
> पूस ! पुसातली भाजी! पूसभाजी.
![]() |
| पहा, वर कोवळा फणस दिसताोय ना, त्याला म्हणतात पारा, कुयरी. |


सुरेख!
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKharach chan ...
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKupach chhan... ��
ReplyDeleteवाह फूस भाजी छानच
ReplyDeleteधन्यवाद
Delete