जीवन दु:खाने भरलेले,
जाणिव होते हटकुन तेव्हा,
येईन म्हणुनी खाडा करते,
कामावरली बाई जेव्हा.
जाणिव होते हटकुन तेव्हा,
येईन म्हणुनी खाडा करते,
कामावरली बाई जेव्हा.
येतो रागही असा भयंकर,
जाऊन वाटे केस धरावे,
का मज छळशी रोज अशी तू,
का महिन्याचे पैसे द्यावे?
येऊच दे ही उद्या आता मी,
पहा कशी फैलावर घेते !
नखरे सगळे उतरुन जातील,
कापुन खाडे पगार देते.
घासून झाली भांडी सगळी,
कपडेसुद्धा धुवून झाले,
भरून आली कंबर आणि
अंग जरासे कसकसलेले.
दमून गेला जीव असा की
बसल्या जागी झोप लागली,
सकाळ झाली कळले जेव्हा
जाग 'तिच्या' हाकेने आली.
'जाऊन आले शाळेमध्ये,
नाच पोरीचा होता ताई!
फोन जरा उशिरा मी केला,
तुमची झाली असेल घाई!'
होते मी तरि धुसफुसलेली,
अजून कंबर होती भरली,
पण सवयीने माझ्यासोबत,
तिच्या कपातही 'चा ओतली'!
Wahhh... Kahani ghar ghar ki...
ReplyDeleteMast...
😊😃😁
DeleteMast
ReplyDeleteअनुभवाने
DeleteWaa wa...kahani ghar ghar ki ha ha..manusaki kitti pan tumchyat masta..
ReplyDeleteThank you Vijaya
Deleteफार भारी
ReplyDelete