तू सगळ्यांचाच लाडका आहेस.
अगदी माझ्या आईचा सुद्धा.
कसाही ये समोर,
तुझं दर्शन सुखावतं.
मला तर लहानपणी तुझी भेट उत्सवच
असे.
तुझी तेजस्वी, स्निग्ध कांती
मला मोहवायची.
अंतरंगाचा अनुभव घेण्याची
अक्कल नव्हती रे तेव्हा!
एक सांगू?
ते प्रेम मात्र आजही तसंच
आहे.
शप्पथ!
तुझ्या जिवावर वाटेल
त्याला तोंड देते मी.
तू घरात आहेस हाच मोठ्ठा आधार
असतो रे!
नशीब पण कसं आहे ना तुझं,
तुला भेटणारी प्रत्येक ‘ती'
तुझी भक्त!😏
मी कशाला रागवू?
तू तयार आहेस की सगळ्याला...😉
मी काय बोलणार?
आणि मी पण एका परीने
तुझं काय-काय नाही करत?🤭
एखादा ‘अंत बघतेयस!' म्हणून
निघूनही गेला असता.
तू मात्र आलास आयुष्यात तेव्हापासून
आमचाच झालायस.
कधी सोडून नको हं जाऊ!
बटाट्या! 🥔
भजी म्हणून, भाजी म्हणून,
काचरी म्हणून, टिक्की म्हणून....
वडा म्हणून नक्की हां...२५ तरी वेळा!
-
सुप्रिया आशिष महाजन
काय हे सुन.. लाई भारी. 🌹🌹
ReplyDeleteसुन्दर लिहले आहे👌👍
ReplyDeleteसुन्दर लिहले आहे👌👍
ReplyDeleteसुन्दर लिहले आहे👌👍
ReplyDelete