संध्या


 

पाचोळ्यावर तांबूस जरा उजेड

ते वेडे शेंडे… बिनपानांची खोडं


सोनेरी… 'तो'ही फिका होय जाताना!

कर्तव्य उणावे काय असे निघताना?



तो रोज गुंगवून जातो तिला स्वतःत.

'ती' अशी लोपते काळवटून नभात.


तो विरहाचा दाह जरी भासेल,

ती धरा तुम्हावर खचित खचित हासेल !


जुळून तुटाया काय मर्त्य तो प्रेमा ?

या तर…

महाभुतांच्या अनाद्यनन्त कहाण्या!



Comments

Post a Comment